का घशाखाली शिरेना घास आता,
कोणती लागे मनाला आस आता? ||१||
पार केले मी हजारो सागरांना,
का खुणावे ही नदी डोळ्यांस आता? ||२||
घेतले होते फुलांचे गंध सारे,
हा नवा येई कशाला वास आता? ||३||
धावलो रस्ते किती श्वासात एका,
का उरे माझ्या उरी हा श्वास आता? ||४||
देह गेला, जीव का अतृप्त आहे,
का शिवेना कावळा पिंडास आता? ||५||
Monday, November 9, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
wachlya mi kavita..
चांगली जमली आहे.
देह गेला, जीवा का अतृप्त आहे,
का शिवेना कावळा पिंडास आता?
आयुष्याचा जमाखर्च अधुराच...
thank u asmita n bhanas...
Post a Comment