मत द्या, मत द्या, प्रत्येकाने मत द्या,
याला किंवा त्याला द्या, पण प्रत्येकाने मत द्या धृ
ओळखपत्र मिळत नाही, यादीत नाव येत नाही,
महापालिकेमध्ये तुमच्या बिल्डिंगबद्दल माहितीच नाही,
लोकशाही भिजते आहे, मतदानाचं छत द्या १
सतत दुष्काळ पडत आहेत, आत्महत्या घडत आहेत,
कोणताही मुद्दा असो, राजकारणी भिडत आहेत,
पडलेल्याला उभा कराया आधाराचा हात द्या २
लिटिल चॅम्प्सपाठोपाठ आजचा आवाज येत आहे,
प्रत्येक पर्वात नवीन नवीन महाविजेता मिळत आहे,
फोफावणार्या चॅनेल्ससाठी एसेमेसचं खत द्या ३
अजिंक्य म्हणून मत द्या, गोळे म्हणून मत द्या,
इतकी छान कविता केली त्यासाठीही मत द्या,
लिहिण्यासाठी पेन आहे, शाईसाठी दौत द्या ४
Friday, September 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment