जाणुनी, झुंजीत नाही शूर मी,
दौडलो ऐसा कसा चौखूर मी १
काव्यप्रांती काय माझी थोरवी,
आग बाकीचे, फुकाचा धूर मी २
ओघ हे मोठे नद्यांचे वाहती,
गावच्या छोट्या नळाचा पूर मी ३
या जगी जे मोठमोठे गायले,
वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ४
का अजिंक्या, मोह काव्याचा पडे,
त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ५
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment