काळचक्र काळ ओढतो अजून,
का मनुष्य व्यास मोजतो अजून १
मात्र रात्र झोपण्या मिळे तयास,
का उगाच स्वप्न पाहतो अजून २
पाहतो जगात तो हिरे अनेक,
कोळसे उगाच वेचतो अजून ३
लागते जमीन फक्त चार हात,
वाटणीवरून भांडतो अजून ४
का स्वत:तला न सापडे प्रकाश,
देवळात देव शोधतो अजून ५
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment