Sunday, August 10, 2008

पावसाळ्यातील एक दिवस

वेळेवर अलार्म झाला, कोंबडा कानि ओरडला,
पाऊसही आला मजला, उठवण्या १

आवरले मग वेगात, आंघोळ उरकली झटपट,
धावलो बॅगसह पटपट, स्टेशनी २

गाडी न थांबली पूर्ण, तरि कुदलो आतच थेट,
बैसण्यास 'विंडो सीट', मिळविली ३

अजिबात हले ना गाडी, स्टेशनात होई 'शोर',
गाडीस मिळेना जोर, धावण्या ४

पाऊस वाढला फ़ार, आतले प्रवासी गप्प,
'सेंट्रल'चे धंदे ठप्प, जाहले ५

एक तास थांबुन आत, मग मुकाट जागा सोडत,
पकडली घराची वाट, सगळ्यांनी ६

माझा जो झाला पोपट, कविता त्याचीच करून,
'पावा'त दिली 'मिसळू'न, चाखण्या ७

No comments: